PSI/STI/ASST पूर्व परीक्षांचा नवा अभ्यासक्रम समजून घ्या. बदललेला अभ्यासक्रम पुढीलप्रमाणे आहे -
1) चालू घडामोडी - जागतिक तसेच भारतातील.
2) आधुनिक भारताचा विशेषत: - महाराष्ट्राचा इतिहास.
3) नागरिकशास्त्र : भारताच्या घटनेचा प्राथमिक अभ्यास, राज्य व्यवस्थापन (प्रशासन), ग्राम व्यवस्थापन (प्रशासन)
4) भूगोल ( महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष अभ्यासासह) : पृथ्वी, जागतिक विभाग, हवामान, अक्षांश-रेखांश, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, प्रजन्यमान, प्रमुख पिके, शहरे, नद्या, उद्योग धंदे इत्यादी.
5) अर्थव्यवस्था : भारतीय अर्थव्यवस्था, राष्ट्रीय उत्पन्न, शेती, उद्योग, परकीय व्यापार, बँकिंग, लोकसंख्या, दारिद्र्य व बेरोजगारी, मुद्रा आणि राजकोशीय नीती इत्यादी शासकीय अर्थव्यवस्था - अर्थसंकल्प लेखा लेखापरीक्षण इत्यादी.
6) सामान्य विज्ञान : भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, प्राणिशास्त्र, वनस्पतिशास्त्र, आरोग्यशास्त्र,
7) बुद्धिमापन चाचणी व अंकगणित.
• अभ्यासासाठी संदर्भ कोणती वापरावी ?
1) मित्रांनो सद्यस्थितीत इयत्ता आठवी ते बारावी चा इतिहास (महाराष्ट्र व भारत)
2) भूगोल व अर्थशास्त्र इयत्ता अकरावी व बारावी.
3) राज्यशास्त्र ( नागरिक शास्त्र) विज्ञान - इयत्ता नववी व दहावी
4) समाजशास्त्र - इयत्ता अकरावी व बारावी.
5) गणित -इयत्ता नववी व दहावी.
खालील पुस्तके पाहिजे असल्यास पुस्तकाच्या images वर click करा व खरेदी करा.
1) तात्यांचा ठोकळा - एकनाथ पाटील
2) संयुक्त पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिका - अभिजित राठोड3) बुद्धिमापन चाचणी - अनिल अंकलगी4) संपूर्ण गणित - चैताली प्रकाशन5) आधुनिक महाराष्ट्राचा समग्र - केे सागर 6) महाराष्ट्राचा भूगोल - एस. बी. सवदी

9) इंडियन पॉलिटी - के सागर
10) विज्ञान आणि तंत्रज्ञान - रंजन कोळंबे
11) आधुनिक भारताचा इतिहास - ग्रोवर आणि वेल्हेकर10) विज्ञान आणि तंत्रज्ञान - रंजन कोळंबे
हे पुस्तके पूर्व व मुख्य परीक्षेसाठी अतिशय उपयुक्त आहेत. या सर्व पुस्तकांचा संदर्भ घेऊन त्यामधील माहिती सहज,सोप्या पद्धतीने उपलब्ध व्हावे यासाठी मी माझ्या ब्लॉगमध्ये शालेय पाठ्यपुस्तक या लिंक वर महाराष्ट्र शासनाचे पहिली ते बारावी पर्यंत PDF उपलब्ध करून दिलेले आहे. आपणास हव्या त्या भाषेमध्ये उपलब्ध होऊ शकते.आपणास हा पर्याय नक्की रुचेल.
PSI / STI / ASST या तिन्ही पदांसाठी संयुक्त पूर्व परीक्षा असते मात्र मुख्य परीक्षा प्रत्येक पदासाठी स्वतंत्र असते. या संयुक्त पूर्व परीक्षांचा थोडक्यात आराखडा कसा असतो ? ते आपण समजून घेऊया. संयुक्त पूर्व परीक्षा 100 गुणांसाठी विचारले जाते. एकूण प्रश्न सुद्धा 100 असतात.प्रत्येक प्रश्नास 01 गुण अशा स्वरूपात असते. आणि निगेटिव्ह मार्किंग पद्धत असल्याकारणाने माहिती असलेले प्रश्नच प्राधान्याने सोडवावेत कारण चुकीच्या चार उत्तरांसाठी एक गुण वजा केला जातो. वेळेत प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी एखादा प्रश्न कठिण वाटल्यास त्यावर वेळ वाया न घालविता पुढील प्रश्नाकडे वळावे. शेवटच्या प्रश्नापर्यंत प्रश्नपत्रिका सोडवून उरलेल्या वेळेत मांगे सोडवलेल्या प्रश्नांचा विचार करावा.कारण या संयुक्त पूर्व परीक्षा चा कालावधी एक तासाचा असतो एका तासामध्ये शंभर प्रश्न आपल्याला सोडवायचे असतात. म्हणून सराव खूप महत्त्वाचा आहे. सरावा बरोबर अभ्यास सुद्धा महत्वाचा आहे. संयुक्त पूर्व परीक्षा फक्त qualify होण्यासाठी असते. मुख्य परीक्षा मध्ये संयुक्त पूर्व परीक्षेचे गुण ग्राह्य धरले जात नाही. त्या दृष्टीने आपण कशा पद्धतीने मुख्यपरीक्षा पात्र होऊ शकतो. यादृष्टीने नियोजनबद्द आणि सातत्यपूर्ण अभ्यासाचे नियोजन अत्यंत महत्त्वाचा आहे.
PSI /STI / ASST संयुक्त पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिकेचे स्वरूप : नव्या अभ्यासक्रमानुसार संपन्न झालेल्या पूर्वपरीक्षा मध्ये खालील प्रमाणे प्रश्नांचे ढोबळ विभागणी केलेले आहे.
2017 महाराष्ट्राचा इतिहास - 05, भारताचा इतिहास - 10, महाराष्ट्राचा भूगोल - 07, भारताचा भूगोल - 09, जगाचा भूगोल - 02, अर्थशास्त्र - 15, राज्यशास्त्र - 08, रसायनशास्त्र - 04, भौतिकशास्त्र - 02, आरोग्यशास्त्र - 04, वनस्पतिशास्त्र - 03, प्राणिशास्त्र - 04 गणित /बुद्धिमत्ता - 15, चालू घडामोडी - 12.
मित्रहो, स्पर्धा परीक्षांमध्ये तो किंवा त्याने जिंकून घेतलं सारं या उक्तीची प्रचिती क्वचितच येते. दोन-चारदा अपयशाचा सामना करावा लागल्यास एका विशिष्ट टप्प्यावर आपल्या क्षमतांविषयी संभ्रम निर्माण होतो. अशावेळी यशस्वी होण्यासाठी प्रचंड आत्मविश्वास, नियोजनबद्ध अभ्यास, सातत्य, चिकाटी या बाबी महत्त्वाच्या ठरतात.
ताणतणावाखाली काही आठवड्याभरात अभ्यासाला वाहून न घेता वेळेचे योग्य नियोजन करा.परीक्षेची तयारी करताना व्यक्तिमत्व सुधारण्यावर भर द्या. आठवड्यातील एक दिवस अभ्यासाला सुट्टी देऊन छंद जोपासा, एखादा चांगला चित्रपट पहा, फिरायला जा. नियमितपणे एखादे प्रेरणादायी चरित्र अभ्यासा. त्यामुळे ताण हलका होऊन अभ्यासात गती मिळेल.
सध्या केंद्र व राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षा अधिक आव्हानात्मक बनल्या आहेत. नव्या परीक्षा पद्धतीत केवळ पाठांतरास प्राध्यान्य न देता संकल्पना व आकलन या बाबींवर भर दिलेला आढळतो. सध्या बाजारात दाखल झालेल्या स्पर्धा परीक्षांच्या ढिगभर पुस्तकांमुळे आपल्या गोंधळातच अधिकच भर पडते. अशा वेळी यशस्वी विद्यार्थी मित्रांच्या सल्ल्यानुसार योग्य पुस्तकाची निवड करा. रोजची राष्ट्रीय दर्जाची दोन - तीन वृत्तपत्रे, शासनाची प्रकाशने, संकेतस्थळांचे यांचे साहाय्याने परीक्षाभिमुख अभ्यास करा.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत ठरवलेल्या अभ्यासक्रमानुसार संयुक्त पूर्व परीक्षाचा आपण नियोजन पूर्वक अभ्यास केलात तर आपणास लवकरात लवकर परीक्षा पास होता येईल.अर्थात आपण लवकर यशस्वी व्हाल आणि आपलं जे ध्येय असेल ते आपण निश्चितपणे पूर्ण कराल अशी अपेक्षा आहे. कारण आपण अभ्यास करत असताना ध्येय जर समोर असेल आणि कष्ट आपल्या सोबत असेल तर निश्चितपणे आपण यशस्वी व्हावं अशी अपेक्षा आहे आणि यासाठी मोजक्याच पुस्तकांचा अभ्यास करणं फार महत्त्वाचा आहे. आणि त्याचं रिव्हिजन करणे सुद्धा अत्यंत महत्त्वाचा आहे.त्यानुसार आपणास संदर्भ पुस्तक हवे असल्यास माझ्या ब्लॉगच्या लिंक मध्ये शालेय पाठ्यपुस्तकांचे लिंक देण्यात आलेले आहे त्यात पहिली ते बारावी सगळ्या विषयांची पुस्तके आहेत त्यानंतर आपणास यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक म्हणजेच YCMOU याची सुद्धा लिंक ब्लॉक मध्ये देण्यात आलेली आहे कारण स्पर्धा परीक्षांसाठी YCM चे पुस्तके सुद्धा अत्यंत महत्त्वाचे ठरतात. त्यासाठी PDF स्वरूपात आपणास महत्त्वाची पुस्तके देण्यात आलेले आहेत. अगदी मोफत कुठल्या प्रकारची फी किंवा कुठल्याही प्रकारचे पैसे लागणार नाही फक्त डाऊनलोड करण्यासाठी नेट लागेल. तेव्हा आळस न करता भरपूर अभ्यास करा आणि लवकरात लवकर यशस्वी व्हा आपणास खूप खूप शुभेच्छा !
हा लेख कसा वाटला, कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. आवडल्यास शेअर करायला विसरू नका.
धन्यवाद….!












Post a Comment
0 Comments