भाषा पेपर क्रमांक एक मराठी व इंग्रजी - 100 गुण अभ्यासक्रम (descriptive)
मराठी - ( एकूण गुण 50)
1) निबंध लेखन - दोन पैकी एका विषयावर सुमारे चारशे शब्दांचे निबंध लेखन लिहिणे - 25 गुण
2) भाषांतर - इंग्रजी उताऱ्याचे मराठीत भाषांतर सुमारे अर्धे पान/ दोन परिच्छेद करणे. - 15 गुण
3) सारांश लेखन - 10 गुण
इंग्रजी - (एकूण गुण 50)
1) Essay writing - An essay on one out of the two given topic/ subject
(about 400 word) - 25 mark
2) Translation - Marathi paragraph to be translated in English approximately one half page/ paragraph - 15 mark
3) precis writing- 10 mark
(खालील पुस्तके पाहिजे असल्यास पुस्तकाच्या images वर click करा व खरेदी करा.)
1) सुगम मराठी व्याकरण व लेखन - मो. रा. वाळंबे
2) English Grammar and composition - pal and Suri3) मराठी निबंध - के सागर
राज्यसेवा मुख्य परीक्षेतील मराठी व इंग्रजी या दोन भाषा विषयात अधिक गुण मिळतील, त्यांनी वरच्या रँकची अपेक्षा ठेवावी, एवढे हे दोन विषय महत्त्वाचे आहेत. मुख्य परीक्षा जवळ येत असताना, उरलेल्या शेवटच्या दिवसांत, विशेषतः इंग्रजी या परीक्षेची तयारी कशी करावी, हाच यक्षप्रश्न अनेकांपुढे असेल. त्यातील निबंधाचा विचार येथे करू या.
अलिकडे परीक्षेत चालू घडामोडी, ठळक घटना, इत्यादींवर निबंध विचारला जातो. त्यामुळे हे विषय कोणते असू शकतील, याचे अंदाज प्रत्येकाने बांधले असतील. पुढील काही विषयांकडे विद्यार्थ्यांनी आवर्जून लक्ष द्यावे. जसेः Odd and Even Formula to Curb Pollution, Water Conservation - A need of Hour, 'Sairat'- in 100 Crore Club, Perils of Inter-Caste Marriage,(या चित्रपटाच्या अनुषंगाने उभा राहिलेला विषय म्हणून याकडे बघता येईल), Should there be censor Board, Rain - Water Harvesting, Farmers suicide, Covid-19, इत्यादी विषय महत्त्वाचे आहेत.
खालील मुद्दे निबंधासाठी विशेष लक्षात ठेवावे.
निबंधाची सुरुवात आकर्षक असावी, जेणेकरून निबंध पुढे वाचण्याची उत्कंठा वाढली पाहिजे जसे- शेतकरी आत्महत्या विषयावरील निबंधासाठीः Just Five paise a kg! Impossible! How Could it be! What the hail is this going on? Is it the value of the farmers hard work ?.......etc.
यानंतर मात्र लगेच निबंधाच्या टॉपिकची ओळख व त्या विषयाचे गांभीर्य याचा उल्लेख करावा.
पुढचा भाग म्हणजे ‘The body of an Essay’ असतो. निबंधाचे हे हृद्यच म्हणा ना! यामध्ये मुख्य कल्पना, तपशील व आपण मांडत असलेल्या मुद्द्यांच्या समर्थनार्थ एखादे छोटे उदाहरण असावे.
निबंधात किती पॅराग्राफ असावेत याला मर्यादा नसते, पण प्रत्येक स्वतंत्र व नवीन विचारासाठी नवीन पॅरा करावा. साधारणतः या परीक्षेसाठी तीन किंवा चार पॅराग्राफ शब्दसंख्या लक्षात घेता पुरेसे ठरावेत.
शेवटच्या पॅराग्राफमध्ये थोडक्यात सर्व मतांचा सारांश मांडून, स्वतःचे मत मांडावे व काही सूचना लिहाव्यात.
निबंधात कधीही पूर्ण गुण देत नसतात. तेव्हा गुण कमी कसे होणार नाहीत, याची काळजी घ्यावी लागते.
भाषांतर - इंग्रजी उतारा चे मराठीत भाषांतर करणे. व मराठी उताऱ्याचे इंग्रजीत भाषांतर करणे.
भाषांतर - इंग्रजी उताऱ्याचे मराठीत भाषांतर करणे 15 गुणांसाठी विचारला जातो व मराठी उताऱ्याचे इंग्रजीत भाषांतर करणे 15 गुणांसाठी विचारला जातो असे एकूण भाषांतरासाठी 30 गुण असतात. यामध्ये इंग्रजी व मराठी उताऱ्याचे अर्धे पान/दोन परिच्छेदाचे भाषांतर करायचा असतो. राज्यसेवा मुख्य परीक्षेचा अभ्यास करत असताना आपल्या वेळापत्रकात रोज एक तास भाषा विषयांसाठी अतिरिक्त ठेवावा जेणेकरून आपला सराव होईल. त्या अर्ध्या तासामध्ये रोज एक मराठी व इंग्रजी परिच्छेदाचे भाषांतर करणे.
सारांश लेखन / precis writing -
सारांश लेखन पेपर मध्ये जो परिच्छेद आपणास देण्यात येतो त्या परिच्छेदास योग्य तो शीर्षक द्यायचा असतो. अशाच पद्धतीने इंग्रजी precis writing सुद्धा असते. प्रत्येकी या ठिकाणी मराठी सारांश लेखन दहा गुण व इंग्रजी precis writing दहा गुण असे एकूण 20 गुणांसाठी या घटकावर प्रश्न विचारले जातात. या घटकाचे योग्य पद्धतीने अभ्यास केल्यास आपणास अधिक गुण मिळतील
वरील पद्धतीने अभ्यास सुरु केल्यास आम्हाला विश्वास आहे तुम्ही भाषा पेपर क्रमांक 1 मध्ये अगदी सोप्या पद्धतीने अभ्यासून राज्यसेवेच्या परीक्षेत यश संपादन कराल.





Post a Comment
0 Comments