राज्यसेवा पूर्व परीक्षासाठी भूगोल
एकूणच राज्यसेवा पूर्वपरीक्षेसाठी भूगोल या विषयाचा अभ्यास करताना योग्य त्या रणनीतीने अभ्यास केल्यास या विषयावर आधारित 18 ते 20 प्रश्नांना सामोरे जाणे निश्चितच शक्य आहे. त्यासाठी खालील महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवणे गरजेचे आहे.
* दिलेला अभ्यासक्रम नीट लक्षात घेणे
* चालू घडामोडींची दिलेल्या अभ्यासक्रमाशी सांगड घालणे.
* सरावासाठी प्राकृतिक भूगोलातील घटकांचे नकाशे तयार करून नियमितपणे पाहणे. नद्यांचा, पर्वतरांगांचा, खाडय़ांचा, बंदरांचा दक्षिणोत्तर अथवा उत्तर-दक्षिण तसेच पूर्व-पश्चिम अथवा पश्चिम-पूर्व क्रम ध्यानात ठेवणे.
* कोणते उपघटक कोणत्या स्रोतामधून वाचायचे आहेत त्याची यादी बनवणे व ते घटक पूर्णपणे वाचून त्यांची वारंवार उजळणी करणे. त्यासाठी जुन्या प्रश्नपत्रिकांचा आधार घेणे.
आत्तापर्यंत विचारलेल्या प्रश्नपत्रिका आपल्या ब्लॉक मध्ये MPSC विभागामध्ये
2011 पासून ते
2019 पर्यंत उत्तरासहित देण्यात आलेले आहेत त्या प्रश्नपत्रिकांचा सराव करून भूगोल विषयात scoring करू शकता.
राज्यसेवा पूर्व परिक्षेत महाराष्ट्र, भारत आणि जगाचा प्राकृतिक, सामाजिक आणि आर्थिक भूगोल असा अभ्यासक्रम दिलेला आहे, तर दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परिक्षांसाठी भूगोल (महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष अभ्यासासह) पृथ्वी, जागतिक विभाग, हवामान, अक्षांश-रेखांश, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान, प्रमुख पिके, शहरे, नद्या, उद्योगधंदे इत्यादी या दोन्हीही अभ्यासक्रमात थोड्या फार प्रमाणात बदल केलेला आहे. दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परिक्षेत महाराष्ट्राचा भूगोलावर अधिक प्रश्न विचारलेले दिसतात, तर राज्यसेवा पूर्व परिक्षेत प्राकृतिक भूगोल, जगाचा भूगोल आणि भारताच्या भूगोलावर प्रश्न विचारण्याचा अधिक भर दिसतो.
भूगोल या विषयावर सध्या कसे प्रश्न विचारले जात आहे? गेल्या तीन वर्षांचे आपल्याला वाटत आहे की, प्राकृतिक भूगोल व जगाचा भूगोल, भारताचा भूगोलआणि महाराष्ट्राचा भूगोल या विषयांवर कशा पद्धतीने प्रश्न विचारले आहेत ते खालील प्रमाणे पाहूया
2017 प्राकृतिक भूगोल - 10 जगाचा भूगोल - 05 भारताचा भूगोल - 07 महाराष्ट्राचा भूगोल - 00
2018 प्राकृतिक भूगोल - 10 जगाचा भूगोल - 01 भारताचा भूगोल - 04 महाराष्ट्राचा भूगोल - 01
2019 प्राकृतिक भूगोल - 08 जगाचा भूगोल - 05 भारताचा भूगोल - 04 महाराष्ट्राचा भूगोल - 03
यावरून आपण बघतो की सरासरी 18 ते 20 प्रश्न भूगोल या विषयावर विचारले जात आहे त्यानुसार खालील पुस्तकांचं अभ्यास करून आपण जास्त जास्त गुण प्राप्त करू शकता.
1) 5 वी ते 12 वी महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तके
टिपः ब्लॉग मध्ये शालेय विभाग आहे. त्यात शालेय पाठ्यपुस्तक वर क्लिक करून पहिली ते बारावी पर्यंत पुस्तकांची PDF डाऊनलोड करू शकता.
(खालील पुस्तके पाहिजे असल्यास पुस्तकाच्या images वर click करा व खरेदी करा.)
2) भारताचा भूगोल - दीपस्तंभ प्रकाशन
3) भूगोल आणि पर्यावरण - एस. बी. संवदी
विषयावर दर वर्षी 18-20 प्रश्न येत आहेत व पुढेही येण्याची अपेक्षा आहे. वरील पद्धतीने अभ्यास सुरु केल्यास आम्हाला विश्वास आहे तुम्ही भूगोलासारखा मोठा विषय अगदी सोप्या पद्धतीने अभ्यासून राज्यसेवेच्या परीक्षेत यश संपादन कराल.
हा लेख कसा वाटला, कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. आवडल्यास शेअर करायला विसरू नका. धन्यवाद…!
Post a Comment
0 Comments