राज्यसेवा मुख्य परीक्षा सामान्य अध्ययन एक इतिहास व भूगोल.
सामान्य अध्ययन एक या पेपरमध्ये मुख्यत: तीन घटकावर प्रश्न विचारले जातात इतिहास, भूगोल आणि कृषी भूगोल.
सामान्य अध्ययन पेपर एक चा विचार केला तर हा वस्तुनिष्ठ स्वरूपाचा असतो आणि एकूण 150 गुणांसाठी विचारला जातो व कालावधी दोन तास या पेपरसाठी देण्यात येतो. अशा पद्धतीने या पेपरचा सर्वसाधारण आराखडा असतो. आपण सविस्तर मुद्दे व संदर्भ पुस्तके खालील प्रमाणे पाहूया.
(खालील पुस्तके पाहिजे असल्यास पुस्तकाच्या images वर click करा व खरेदी करा.)
1) महाराष्ट्राचा इतिहास - अनिल कठारे
सामान्य अध्ययन पेपर 1 चा अभ्यासक्रम
अ) इतिहास -
१) आधुनिक भारताचा विशेषत: महाराष्ट्राचा इतिहास (१८१८-१८५७)
२) ब्रिटिश सत्तेची भारतामध्ये स्थापना.
३) सामाजिक - सांस्कृतिक बदल.
४) सामाजिक व आर्थिक जागृती.
५) भारतीय राष्ट्रवादाची निर्मिती व विकास.
६) गांधी युगातील राष्ट्रीय चळवळ.
७) स्वतंत्र उत्तर भारत.
८) महाराष्ट्रातील निवडक समाज सुधारक - त्यांचे विचार प्रणाली व कार्य.
९) महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा ( प्राचीन ते आधुनिक )
ब) भूगोल - ( महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह )
१) प्राकृतिक भूगोल.
२) महाराष्ट्राचा आर्थिक भूगोल.
३) महाराष्ट्राचा मानवी व सामाजिक भूगोल.
४) पर्यावरणीय भूगोल.
५) जन भूगोलशास्त्र ( राष्ट्राच्या संदर्भात )
६) सुदूर संवेदना.
क) भूगोल व कृषि -
१) कृषि परिस्थितीकी.
२) हवामान.
३) मृदा.
४) जल व्यवस्थापन.
या मुद्द्यांचा आपण योग्य पद्धतीने अभ्यास केला तर आपणास अधिकचे गुण प्राप्त होऊ शकतात. कारण मुद्द्यानुसार अभ्यास आणि सराव (revision) हे आपल्याला यशापर्यंत पोचवण्याचं अत्यंत सोपा मार्ग आहे. आपण समजा एखादं पुस्तक घेतलं की पहिल्या पेज पासून शेवटच्या पेज पर्यंत वाचण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु तसं न करता आपल्याला आयोगाने जेवढा अभ्यासक्रम ठरवून दिलेला आहे त्या अभ्यासक्रमाप्रमाणे आपण जर अभ्यास केला तर नक्कीच लवकरात लवकर आपल्याला यश प्राप्त होऊ शकतो किंवा आपण यशस्वी होऊ शकतो वरील दिलेल्या मुद्द्यानुसार आपण नोट्स तयार करून त्या नोट्स जास्त जास्त रिविजन करून जुन्या प्रश्नपत्रिकांचा सराव करा जेणेकरून आपणास सामान्य अध्ययन पेपर 1 मध्ये आपणास जास्त गुण प्राप्त होऊ शकतात.
टीप : आपल्या ब्लॉग मध्ये MPSC विभाग आहे. राज्यसेवा प्रश्नपत्रिका लिंक आहे त्या लिंक वर क्लिक केल्यानंतर आपणास एक टेबल ओपन होईल त्या टेबल मध्ये 2012 ते 2019 पर्यंत आयोगाने विचारलेल्या सर्व प्रश्नपत्रिका उत्तरासहित ब्लॉग मध्ये देण्यात आलेल्या आहेत. त्याचा जास्त - जास्त उपयोग कराल अशी अपेक्षा आपणासमोर व्यक्त करतो.
वरील पद्धतीने अभ्यास सुरु केल्यास आम्हाला विश्वास आहे तुम्ही सामान्य अध्ययन पेपर 1 हा मोठा विषय अगदी सोप्या पद्धतीने अभ्यासून राज्यसेवेच्या परीक्षेत यश संपादन कराल.
हा लेख कसा वाटला, कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. आवडल्यास शेअर करायला विसरू नका.
धन्यवाद….!






Post a Comment
0 Comments